शिवसेनेची पश्चिम बंगाल निवडणुकीतून माघार, ही नोटासाठी वाईट बातमी; भाजपची बोचरी टीका

dinesh pratap singh-uddhav thackeray

मुंबई :- आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्तेत असलेल्या शिवसेनेने आपले उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले होते. आता मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता शिवसेना पश्चिम बंगाल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन या निर्णयाबाबतची अधिकृत घोषणा केली.

“शिवसेना (Shivsena) पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, याविषयी अनेक जणांच्या मनात कुतूहल आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात आला. सद्यस्थिती पाहता ही निवडणूक ‘दीदी विरुद्ध सगळे’ अशी होणार आहे. सर्व एम – मनी (पैसा), मसल्स (शक्ती) आणि मीडिया हे सर्व आयुध ‘म’मतादीदींच्या विरोधात वापरले जात आहे. त्यामुळे शिवसेनेने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका न लढवता त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ममता दीदींना गर्जना करणारे यश चिंतीतो. आमच्या मते त्याच खऱ्या बंगाली वाघीण आहेत.” अशा आशयाचे ट्विट संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.

बंगालच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भाजपने शिवसेनेवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. रायबरेलीचे भाजपा आमदार दिनेश प्रताप सिंह (Dinesh Pratap Singh) यांनी आपल्या ट्विटरवरुन शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. शिवसेना पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढणार नाही, ही नोटासाठी वाईट बातमी आहे. कारण, आता नोटाला सर्वात कमी मतं मिळाल्याच्या यादीत नोटाचाच नंबर असणार आहे, असे बोचरी टीका सिंह यांनी केली. शिवसेनेला पश्चिम बंगालमध्ये नोटापेक्षाही कमी मतं पडली असती, असेच त्यांनी आपल्या ट्विटमधून सुचवण्याचा प्रयत्न केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER