‘शिवसेनेची विजयी घोडदौड म्हणजे जनतेकडून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब’

Shambhuraj Desai-CM Thackeray

सातारा :- सध्या राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे (Grampanchayat Election Result) निकाल हाती येत असून, शिवसेना (Shivsena) मोठा भाऊ असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यन्त शिवसेनेने भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मागे टाकल्याचे चित्र दिसून येत असून जवळपास 328 ग्रामपंचातींवर विजय मिळवला आहे. राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत पाटणमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. पाटण तालुक्यात 13 ग्रामपंचायती शिवसेनेला मिळाल्या आहेत. त्यावर शंभूराज देसाई यांनी समाधान व्यक्त केलं आहे. राज्यभरात शिवसेनेला घवघवीत यश मिळत आहे. खेड्यापाड्यातील जनतेने मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व स्वीकारल्याचं त्यातून स्पष्ट होत आहे, असं देसाई यांनी सांगितलं.

शंभूराज देसाई यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जनतेची सेवा करण्याचे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याचे आदेश आम्हाला दिले होते. त्यानुसार आम्ही काम करत होतो. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आणि जनतेच्या इतर समस्या आम्ही सोडवत होतो. त्याचचं प्रतिबिंब आजच्या निकालात दिसून आलं. लोकांनी शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारलं आहे. कोविड, वादळ, अतिवृष्टीच्या काळात शिवसेनेने केलेल्या कामाची ही पावतीच आहे. आम्ही तळागाळापर्यंत जाऊन काम केलं. त्याचा हा परिणाम आहे. खेड्यापाड्यातील लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर केलेलं हे शिक्कामोर्तब आहे, असं देसाई यांनी सांगितलं.

सत्तेचा उपयोग लोकांसाठी केला पाहिजे. सत्ता ही आमदार, मंत्र्यांना फिरण्यासाठी नसते. ज्या लोकांनी तुम्हाला सत्तेत बसवलं त्या लोकांसाठी सत्ता वापरली पाहिजे. त्यांची कामं केली पाहिजे, ही आमच्या पक्षाची शिकवण आहे. तेच काम आम्ही करत असतो, असं त्यांनी सांगितलं. यापूर्वीही स्थानिक निवडणुकांमध्ये शिवसेना ताकदीने लढत होती. काही ठिकाणी आम्ही सत्तेत होतो. पण स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून जनतेची प्रश्न मोठ्या प्रमाणवर सोडण्याच्या विचार करूनच गेल्या वर्षभरापासून आम्ही लोकांच्या संपर्कात गेलो. पक्षबांधणी केली. त्यामुळेच आज आम्हाला यश मिळत आहे, असंही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : शिवसेना ‘बिनविरोध’ मोठा भाऊ; अनेक ठिकाणी राष्ट्रवादी, काँग्रेसला मागे टाकले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER