बाळासाहेबांचा ‘जनाब’ उल्लेख म्हणजे वैचारिक सुंता ; कॅलेंडरवरुन भाजपची शिवसेनेवर हल्ला

Shivsena-BJP

मुंबई : शिवसेनेच्या उर्दू कॅलेंडरमध्ये (Urdu calendar) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा उल्लेख जनाब आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उल्लेख ‘शिवाजी जयंती’ असा केल्याने, भाजपने शिवसेनेवर (Shivsena) टीकास्त्र सोडले आहे .

शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून वैचारिक सुंता करून घ्यावी तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही”, असे ट्विट भाजप आमदार अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी केले आहे .

शिवसेनेने एक महिन्यापूर्वी अजान स्पर्धा घेतली. तेव्हाच मी म्हटलं होतं, शिवसेनेने भगवा तर सोडलाच, पण हिरवा हाती घेणं बाकी आहे. आता तर वडाळा विधानसभेच्या शिवसेनेने चक्क उर्दूमध्ये नव्या वर्षाचे कॅलेंडर काढले . एव्हढंच नव्हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray) यांचं नामकरण करुन हिंदुहृदयसम्राट ऐवजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख जनाब बाळासाहेब असा उल्लेख केला. उर्दू आणि मुस्लिम कॅलेंडरप्रमाणे, चंद्रोदय, सूर्योदय देण्याचं काम केलं. एव्हढंच नव्हे छत्रपती शिवाजी महारांजाच्या जयंतीच्या दिवशी फक्त शिवाजी जयंती असा एकेरी उल्लेख करण्याचं धाडस सुद्धा या कॅलेंडरमधून करण्यात आला आहे. याचा मी निषेध करतोच. औरंगाबादचं संभाजीनगर नाही, पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नामकरण जनाब बाळासाहेब ठाकरे असं मतांच्या राजकारणासाठी शिवसेनेने करुन दाखवले , असे भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहे .

ही बातमी पण वाचा : ‘महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा करेल’, भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER