शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा तर होणारच – संजय राऊत

Sanjay Raut.jpg

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला. या दरम्यान, अनेक सण आणि उत्सवांवर बंधने घालण्यात आली. लोकांची गर्दी होऊ नये याची खबरदारीही घेतली जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या (Shivsena) ऐतिहासिक दसरा मेळाव्यावर यंदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याच मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठे विधान केले आहे. यंदा शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा वेगळ्या पद्धतीने साजरा होण्याची शक्यता आहे. शिवसेना दरवर्षी शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करत असते. यंदा ठाकरे घराण्यातील पहिले मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झाले आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा विचार होता. पण यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल पद्धतीने साजरा होऊ शकते, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा तर होणारच आहे.

मात्र मेळाव्याला लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर गोळा होतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.  डिजिटल व्यासपीठावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याचा पर्याय खुला आहे. यासाठी लवकरच पक्षातील नेते एकत्र येऊन चर्चा करतील. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील, असेही राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER