शिवसेनेचे ठाकरे सरकार विकासाला विरोध करत आहे, हे फार काळ चालणार नाही – भाजप

Ram Kadam & Uddhav Thackeray

मुंबई : ठाणे (Thane) महानगर पालिकेने बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी त्यांच्या अखत्यारीत असलेली जमीन देण्यास नकार दिला आहे. तेथील महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. याआधी बिकेसी मधील ज्या ठिकाणी बुलेट ट्रेनचं स्टेशन होणार आहे तिथे मेट्रो कारशेड बनवण्यासाठी जागा देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घोषित केली आहे. बुलेट ट्रेनचा प्रस्ताव मनमोहन सिंग सरकारच्या काळात आला होता पण पंतप्रधान मोदींनी या प्रकल्पाला गती दिली. गुजरातमध्ये या प्रकल्पासाठी ९० टक्के जमीन अधिग्रहित झाली आहे. पण महाराष्ट्रात मात्र केवळ २० टक्के जमीन अधिग्रहित झाली आहे. शिवसेनेचे हे ठाकरे सरकार विकासाला विरोध करत आहे. हे फार काळ चालणार नाही”, अशा स्पष्ट शब्दांत भाजप (BJP) नेते राम कदम (Ram Kadam) यांनी शिवसेनेला सुनावले आहे.

कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या जागेवरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात जुंपली असतानाच बुलेट ट्रेन प्रकल्पावरून ठाणे महापालिकेने यात उडी घेतली आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पात ठाणे-दिव्यालगतच्या म्हातार्डी भागात स्थानक उभारण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव ठाणे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने बुधवारी नाकारला. वांद्रे-कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनच्या जागेवर मेट्रो कारशेड उभारण्याच्या चाचपणीनंतर शिवसेनेने हे पाऊल उचलून केंद्रातील भाजपला शह देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.

दरम्यान, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातून निघणारा बुलेट ट्रेनचा मार्ग नवी मुंबईतील महापे-आडीवली भुतवली भागातून पुढे शीळ, डायघर भागातून म्हातार्डी येथून पालघर जिल्ह्य़ाच्या दिशेने प्रस्तावित आहे. त्यात ठाणे महापालिका क्षेत्रातील शीळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावांतील जमीन लागणार आहे. मुंबईनंतर म्हातार्डी भागात बुलेट ट्रेनचे दुसरे स्थानक असणार आहे. याच स्थानकाला ठाणे स्थानक म्हणून प्रस्तावित करण्यात आले आहे. परंतु ठाणे पालिका सर्वसाधारण सभेत या संबंधीचा प्रस्ताव दप्तरी दाखल करत शिवसेनेने बुलेट ट्रेन प्रकल्पास धक्का दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER