‘हिंदुत्वासाठी शिवसेनेची तलवार सर्वात आधी म्यानाबाहेर पडेल’ – संजय राऊत

मुंबई : हिंदुत्व हे शिवसेनेचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे आमचं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आहोत आणि राहू असं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी भाजपला टोला लगावला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ८वा स्मृतीदिन असून शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी सकाळपासून शिवसेना कार्यकर्ते आणि नेते गर्दी करत आहेत. संजय राऊतदेखील स्मृतीस्थळावर पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हिंदुत्वावरुन भाजपा शिवसेनेवर करत असलेल्या टीकेबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, आमचं हिंदुत्व प्रमाणित करण्यासाठी, स्प्ष्ट करण्यासाठी इतर कोणत्या पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आहोत आणि राहू, आम्हाला तुमच्याकडून प्रमाणपत्राची गरज नाही. आम्ही कधीच हिंदुत्वाचं राजकारण करत नाही. देशात जिथे कुठे गरज पडेल तेव्हा हिंदुत्वाची तलवार सर्वात आधी शिवसेनेची बाहेर निघेल.

गेल्या वर्षी याच काळात सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरु होती. लोकांच्या मनात शंका होत्या. पण आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळार शिवसेनेचा मुख्यमंत्री तेसुद्दा उद्धव ठाकरे यांच्या रुपाने मानवंदना देण्यासाठी आले आहेत. बाळासाहेब आमच्यात नाहीत ही वेदना कायम राहील. पण बाळासाहेब आमच्यासोबत आहेत आणि सतत राहतील, प्रेरणा देतील असा विश्वास आहे.

आजच्या दिवशी शिवसेनाप्रमुखांना आम्ही फक्त देहाने निरोप दिला पण त्यांचे विचार, हिंदुत्व, मराठी बाणा हे सगळं आमच्यासोबत कायमस्वरुपी आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात हा वारसा पुढे नेऊ, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आजही देशाचं राजकारण ५५ वर्षांपूर्वूी बाळासाहेबांनी जो बेरोजगारी, भूमीपुत्रांचा मुद्दा मांडला त्यावरच केंद्रीत आहे. बिहार निवडणुकीत पाहिलं असेल तर या दोन मुद्द्यांवर विषय केंद्रीत राहिला. महाराष्ट्रात बाळासाहेबांनी ५५ वर्षांपूर्वी ठिणगी टाकली होती. प्रत्येक राज्यात भूमीपूत्रांचा विषय राजकारणातला आणि समाजकारणातला महत्वाचा विषय ठरतोय, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER