शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार दिल्लीला!

CM Uddhav Thackeray

मुंबई : कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचे आंदोलन गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे .

शिवसेनेनंही (Shiv Sena) या आंदोलनात पाठिंबा द्यावा, या मागणीसाठी शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि खासदार प्रेमसिंग चंदूमाजरा (Prem Singh Chandumajra) यांनी आज वर्षा येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत अकाली दलाच्या (Akali Dal) नेत्यांनी आंदोलनाबद्दल माहिती दिली. तसंच या आंदोलनात शिवसेनेनंही सहभागी व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अकाली दलाच्या नेत्यांना आश्वासन देत पुढील दोन आठवड्यांत दिल्लीला येणार असल्याचे सांगितले.

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी बांधव तसंच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. हे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीत हजारो शेतकरी ठाण मांडून आहेत. सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही हे चित्र असल्याने संयुक्त शेतकरी आघाडीने ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने आपापली भूमिका जाहीर केली आहे.

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सक्रिय पाठिंबा देत महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER