हे ज्यांनी केले, त्यांचा मला अभिमान आहे ; बाळासाहेबांच्या आठवणींना जाहीरातीतून उजाळा

Balasaheb Thackeray

मुंबई : अयोध्येतील (Ayodhya) ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहेत, तो रामजन्मभूमी भूमिपूजन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 44 मिनिटांच्या मुहूर्तावर हे भूमिपूजन होणार आहे. शिवसेनेनेही (Shivsena) राम मंदिराच्या आठवणींना उजाळा देत ‘हे ज्यांनी केले, त्यांचा मला अभिमान आहे!’ अशा शिर्षकाची सूचक जाहिरात केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये ही पहिल्या पानावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. “हे ज्यांनी केले, त्यांचा मला अभिमान आहे !” अशा शिर्षकाखाली ही मोठी जाहिरात करण्यात आली आहे. अयोध्येत निर्माण होणाऱ्या रामलल्ला मंदिरासाठी शिवसेनेनं केलेल्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही जाहिरात शिवसेनेचे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या नावाने ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे. तर या फोटोमध्ये बाबरी मस्जिद विद्धवंसाचा फोटो वापरण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER