नगरमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार; शंकरराव गडाख अखेर सक्रिय !

Shankarrao Gadakh

अहमदनगर : राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी मागील महिन्यात शिवबंधन हाती बांधून शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शंकरराव गडाख यांना पक्षात घेऊन अहमदनगरमध्ये शिवसेनेची ताकद वाढविण्याचा संकल्प केला आहे. त्याला गडाखांकडून प्रतिसादही मिळत आहे.

माजी दिवंगत आमदार अनिल राठोड (Anil Rathod ) यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी गडाख यांचा शिवसेना प्रवेश पक्षाला नवसंजीवनी देणारा आहे. शंकरराव गडाख आता शिवसेनेत सक्रिय होऊ लागले असून, जिल्हाभर बैठकांचे नियोजन त्यांनी केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नगर शहरातील शिवसेनेमध्ये असलेली गटबाजी दिसून येत होती. गडाख यांनी नगर शहर शिवसेनेची शुक्रवारी सकाळी सोनई येथे बैठक घेऊन प्रत्येकाची मते जाणून घेतली. या बैठकीस शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, माजी आमदार विजय औटी, नगर शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, माजी महापौर अभिषेक कळमकर, यांच्यासह नगरसेवक व शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अनिल भय्या राठोड यांच्या निधनानंतर शिवसेनेचे काय होणार, असा प्रश्‍न शिवसैनिकांकडून उपस्थित केला जात होता. मात्र काही दिवसांनीच मंत्री गडाख यांनी शिवबंधन हाती बांधले. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे जिल्ह्यासाठी शिवसेनेला आयता नेता मिळाला. मात्र ते सक्रिय कधी होणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले होते. अखेर शिवसैनिकांची प्रतीक्षा संपुष्टात आली. मंत्री गडाख यांनी सक्रिय होत तालुकानिहाय बैठकांचे नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पहिली बैठक नगर शहरातील पदाधिकारी, नगरसेवक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी सोनईत पार पडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER