‘निवडणूक सरली, आश्वासनं विरली’ शिवसेनेचा हाच नारा गावागावांत पोहचला; भाजपची टीका

Atul Bhatkhalkar - Maharashtra Today

मुंबई : पीएम किसान योजनेच्या अंतर्गत काल देशभरातील ९.५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर २० हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने जाहीर केलेली मदत अद्यापही लाभार्थ्यांना मिळाली नसल्याचा आरोप विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून केला जात आहे. याच मुद्द्यावर भाजपचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेला डिवचले आहे.

भातखळकर यांनी शिवसेनेद्वारे जारी केलेल्या एका पोस्टरचा फोटो शेअर करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून मोदी सरकार महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करत असताना, पोस्टरबाज शिवसेनेने मात्र ‘निवडणूक सरली, आश्वासनं विरली’ हाच नारा गावागावांत पोहचवलाय. पण महाराष्ट्र जागा आहे, असे भातखळकर म्हणाले.

कोरोना संकटकाळात पीआर, बॅनरबाजी, जाहिरातबाजी न करता भाजप कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांनी रुग्णसेवेत झोकून दिले आहे. कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी स्वतःच्या घराची जागाच कोविड केंद्रासाठी दिलीय. याच शिकवण, संस्कार, त्याग, दातृत्वातून भाजप घडला आहे. ठाकरे सरकार आरामखुर्चीतच बसून आहे. बुरशी रोग अधिसूचित आजार म्हणून जाहीर करून त्याच्या नियंत्रणासाठी हरियाणा सरकारने तातडीचे पाऊल उचलले. महाराष्ट्रात मात्र रुग्णांची नेमकी संख्याही माहिती नाही. ढिम्म सरकार जागे हो, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा टोला लगावला.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button