… काम होत नाहीत; शिवसेनेचे संजय जाधव यांनी पाठवला खासदारकीचा राजीनामा

- राष्ट्रवादीला मिळते झुकते माप - आरोप

Sanjay Jadhav-CM Thackeray

औरंगाबाद : सत्तेत असूनही कामे होत नाहीत. त्यामुळे खासदारकी काय कामाची? फक्त राष्ट्रवादीचीच (NCP) कामे होतात, असा आरोप करत शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी राजीनाम्याचं पत्र मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठवले आहे.

जाधव म्हणाले की – जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचे अशासकीय मंडळ नियुक्त करण्यासाठी पाठपुरावा केला; पण काहीही झाले नाही. त्यामुळे राजीनामा दिला आहे.

सरकारमध्ये असूनही काम होत नाही या अस्वस्थतेतून जाधव यांनी हा राजीनामा दिला आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम होत नाही, अशी शिवसैनिकांची भावना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेचा पुरेपूर वापर करून कार्यकर्त्यांना ताकद देऊन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करते आहे. असे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

सत्तेत तीन पक्ष असले तरी सरकारवर वर्चस्व फक्त राष्ट्रवादीचे असल्याचे दिसते. पूर्ण विचारांती स्वेच्छेने मी राजीनामा देतो आहे. साधा शिवसैनिक म्हणून काम करेन, असेही राजीनामा पत्रात म्हटले आहे.

या राजीनामा पत्रानंतर शिवसेनेत जोरदार हालचाली सुरू झाल्या असून जाधव यांचे मन वळविण्याचाही प्रयत्न सुरू झाले आहेत. सत्तेतली महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे असून त्यांच्या कार्यकर्त्यांना झुकते माप मिळत असल्याने काँग्रेस आणि शिवसेनेत नाराजी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER