पुढीच्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार , शिवसेनेकडून स्वबळाचा निर्धार

Subhash Desai

औरंगाबाद :- आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीसह सर्व निवडणुका स्वबळावर लढून पुढे जाण्याचा निर्धार मंगळवारी शिवसेनेच्या औरंगाबादमधील स्थापनेच्या ३६ व्या वर्धापन दिनी आयोजित ऑनलाईन मेळाव्यात करण्यात आला. मराठवाड्यातील पहिल्या शिवसेना शाखेच्या ३६ व्या वर्धापनदिना निमित्त आयोजित शिवसैनिकांच्या व्हर्च्युल मेळाव्याला मार्गदर्शन करतांना देसाई यांनी स्वबळाचा नारा दिला.

यावेळी सुभाष देसाई (Subhash Desai) म्हणाले, विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहात शिवसेनेचे (Shiv Sena) वाघ आपण निवडून पाठवले. लोकांचा शिवसेना व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले. नुकत्याच झालेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत देखील आपण यश मिळवत ती ताब्यात घेतली. आता यापुढे देखील येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषदांसह सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवाच फडकला पाहिजे, या दृष्टीने शिवसैनिकांने झोकून देत काम करावे, असे आवाहन करत औरंगाबाद शहरासाठी १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु झाले आहे. शहरातील रस्त्यांची कामे होत आहेत. सफारी पार्क होत आहे. जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली जात आहे. त्यामुळे यापुढे येणाऱ्या सर्व निवडणुकांत शिवसेना पुढे जाईल. आता कुठलीही चूक आपल्या हातून होता कामा नये. शिवसेना ही चार अक्षरे जिवंत ठेवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. काही शिवसैनिक आज आपल्यात नाहीत. त्यांच्या त्यागामुळे शिवसेनेची अक्षरे सर्वत्र कोरली गेली आहेत, अशी भावना देसाई (Bhawna Desai) यांनी व्यक्त केली.

शिवसेना (Shivsena) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले की, पुढच्यावर्षी येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेनेने एकट्याच्या बळावर लढल्या पाहिजेत, असा संकल्प वर्धापनदिनी केला पाहिजे. जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समित्यांसह सर्व निवडणुका स्वबळावर लढल्या पाहिजेत. जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे म्हणाले, महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या ६० टक्के जागा आहेत. जिल्हा बँकही ताब्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना आगामी काळात सक्षमपणे पुढे जाईल.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेने मुंबईची तुंबापुरी करुन दाखवली, भाजपची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button