सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकायलाच हवा! : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray - Shiv Sena

मुंबई :- आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. यापार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे . हे पाहता शिवसेनेनेही कंबर कसली असून या निवडणुकांमध्ये शिवसेना नंबर वन पक्ष झाला पाहिजे. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकायलाच हवा. यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागा, असे आदेश शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज जिल्हाप्रमुखांना दिले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीविषयीची माहिती शिवसेना नेते, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागा. समाजोपयोगी कामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास जिंका. संपर्पमंत्री, पालकमंत्री यांच्याशी समन्वय वाढवा. एकजुटीने या निवडणुकीना सामोरे जा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिले.

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आज सत्तेवर आहे. त्याचा लाभ तळागाळातील जनतेला व्हायला हवा. सरकारने जनतेच्या हिताचे घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षसंघटना कार्यक्षम करा. विभागाविभागातील जनतेची कामे करण्यासाठी पुढाकार घ्या. लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घ्या आणि त्या सोडविण्यासाठी संबंधित मंत्र्यांना भेटा व जनतेची कामे करा, असे उद्धव ठाकरे यांनी दिले.

तसेच राज्यात वाढत असलेले कोरोनाचे संकट रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावेळी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : … माझे सरकार, माझी स्थगिती; अन् रोज फजिती! भाजपाचा उद्धव ठाकरेना टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER