नाना पटोलेंमध्ये शिवसेनेचे संस्कार उतरत आहेत ….

Shiv Sena's rites are coming down in Nana Patole ....shivsena mp sawant on nana ptole

मुंबई : कॉंग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana patole) यांनी काल बॉलिवूड हस्तींवर निशाणा साधत महानायक अमिताभ बच्चन व अक्षय कुमार याचे चित्रपट महाराष्ट्रत प्रदर्शित होऊ देणार नाही असे विधान केले. नानांच्या या विधानावर शिवसेनेचे नेते खासदार अरविद सावंत (Arvind sawant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोलेंमध्ये शिवसेनेचे संस्कार उतरत आहेत असे म्हटले आहे. म्हणजेच सावंत यांना नानांमध्ये शिवसेनेची आक्रमकता उतरत आहे असे म्हणायचे आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन विदर्भातील कॉंग्रेसचे दबंग नेते म्हणून ओळख असलेले नाना पटोले यांनी नुकतीच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतली आहेत. नाना यांची ओळख पुर्वीपासूनच एक आक्रमक नेता म्हणून ओळख आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर नानांना विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवण्यात आले होते मात्र, त्यांनी ते पद त्यागून प्रदेशाध्यपद घेतले आहे. आता पुन्हा नानांचा आक्रमक चेहरा राज्याला दिसणार आहे. प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हाती आल्य़ानंतर पहिला निशाणा त्यांनी बॉलिवूड हस्ती महानायक अमिताभ बच्चव व बॉलिवूडचा महागडा अभिनेता अक्षय कुमार यांच्यावर साधला. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही अशी डरकाडी काल नानांनी फोडली आणि एकच चर्चा झाली.
केंद्राने लागू केलेल्या नवीन कृषी कायदे असो वा पेट्रोल डिझेल, गॅस दरवाढ यावर हे अभिनेते युपीए सरकारच्या राज्यात सरकारविरुद्ध मोठी आरोळी ठोकाय़चे. यांची टिवटिव चालायची आता हेच अभिनेते मोदींच्या सरकारमध्ये गप्प का असा सवाल नानांनी विचारला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER