मतांसाठी शिवसेनेचा नामांतराचा ‘सामना’, बाळासाहेब थोरातांचा टोमणा

Uddhav Thackeray - Balasaheb Thorat

मुंबई : औरंगाबादच्या ‘संभाजीनगर’ नामांतरावरून सत्तारूढ महाविकास आघाडीत मतभेद आहेत. शिवसेना आणि काँग्रेसमध्येच आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेने काँग्रेसला औरंगजेबाबद्दलच्या प्रेमावरून डिवचले तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मतांसाठी शिवसेनेचा नामांतराचा ‘सामना’ सुरू आहे, असा टोमणा मारला.

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याच्या हालचाली ठाकरे सरकारकडून सुरु झाल्या आहेत. सीएमओ म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाच्या ऑफिशियल ट्विटर हॅन्डलवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला होता. यावर काँग्रेसने विरोध दर्शवला. त्यानंतरही शिवसेनेकडून नामांतराच्या समर्थनात वक्तव्य करण्यात आली. काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा नामांतराबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सामनातून काँग्रेसवर टीका केली. ‘औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे!,” असे म्हटले.

यावर बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करत उत्तर दिलं आहे – औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे, मात्र मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER