शिवसेनेचा भाजपाला धक्का, देऊळगाव राजा नगराध्यक्षासह दोन नगरसेविकांचा शिवसेनेत प्रवेश

Deulgaon Raja Mayor and two corporators join Shiv Sena - Maharashtra Today

बुलढाणा : जळगाव महापालिकेत (Jalgaon Municipal Corporation) भाजपची (BJP) असलेली सत्ता उलथवून लावून शिवसेनेने (Shiv Sena) आपला बसवला. त्यानंतर आता बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगरपरिषदेतील अध्यक्षासह दोन नगरसेनिकांना गळाला लावण्यात शिवसेनेला मोठे यश प्राप्त झाले आहे.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानी वर्षा येथे हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. देऊळगाव राजा येथील भाजपच्या विद्यमान नगराध्यक्षा सुनिताताई शिंदे, आणि नगरसेविका मालनबी पठाण व पल्लवीताई वाजपे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यांचा हा पक्षप्रवेश भाजपाला धक्का मानला जात आहे. पुढच्या निवडणुकीत याचा फटका भाजपला बसू शकतो, अशी चर्चाही सध्या रंगली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER