शिवसेनेचे भाजपला धक्क्यावर धक्के ; मुंबईतही भाजप नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

Precila Kadam & Anil Kadam Joins Shiv Sena

मुंबई : मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून (Shiv Sena) भाजपला (BJP) धक्क्यावर धक्के मिळत आहेत. भाजप आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांचे कट्टर समर्थक अनिल कदम (Anil Kadam) आणि प्रेसिला कदम (Precila Kadam) यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

काही दिवसांपूर्वी माजी आमदार कृष्णा हेगडेंच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे भाजपाला जोरदार धक्का बसला होता.

आता त्या पाठोपाठ अँटॉप हिल वडाळातल्या अनिल कदम आणि प्रेसिला कदम यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हस्ते हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. कदम यांचा हा प्रवेश आमदार कोळंबकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मागील काही काळापासून ते भाजपमध्ये अस्वस्थ असल्याचे बोलले जात होते.

दरम्यान, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या कोकण दौ-याचा भाजपकडून गाजावाजा झाला होता. तेथेही अमित शहा फिरताच मोठा धक्का दिला आहे. नारायण राणेंच्या क्षेत्रातील 7 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER