पुन्हा शिवसेनेचा बुलंद आवाज; नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी निवड

Neelam Gorhe

मुंबई : ममहाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) उपसभापतिपदासाठी नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या नावाची निवड करण्यात आली होती. विधानपरिषदेत नीलम गोऱ्हे यांची एकमतानं उपसभापतिपदी (Deputy-chairperson) निवड करण्यात आली. परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर एकमतानं नीलम गोऱ्हे यांची उपसभापतिपदी निवड करण्यात आली.

दरम्यान, उपसभापती निवडणुकीच्या वेळी भाजपने सभात्याग केला. भाजपने हायकोर्टात धाव घेतल्याने विधानपरिषद उपसभापतिपदाच्या निवडणुकीत रंगत वाढली होती; मात्र आपल्याला कोर्टाने बोलावले नसल्याचे सांगत सभापती रामराजे निंबाळकर यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली आणि विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची निवड झाली.

दरम्यान भाजपकडून दिग्गज नेते आणि विधानपरिषद आमदार भाई ऊर्फ विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. मात्र विरोधकांच्या सभात्यागामुळे डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER