शिवसेनेच्या भगव्याचे शुद्धीकरण करण्याची गरज; आशिष शेलारांचा टोमणा

Ashish Shelar & Uddhav Thackeray

औरंगाबाद : शिवसेनेच्या (Shiv Sena) भगव्याचे शुद्धीकरण करण्याची गरज आहे, असा टोमणा भाजपाचे नेते आ. आशिष शेलार यांनी मारला.

मुंबई मनपाच्या आगामी निवडणुकीत मनपावर भाजपाचा (BJP) भगवा फडकेल, असे भाजपाचे नेते व विराधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काल भाजपाच्या बैठकीत म्हणाले होते.

यावर, शिवसेनेचे नेते व प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘शुद्ध भगवा’ असा वाद निर्माण केला. फडणवीसांना उत्तर देताना म्हणाले – भाजपने इतिहास चाळला तर, भाजपला कळेल की, शुद्ध भगवा कोणाचा आहे. आमचा भगवा हा शिवरायांचा आहे. तो शुद्ध आहे. सध्या भाजपाही भगव्याच्या प्रेमात पडली आहे. मात्र त्यांचे हे भगवाप्रेम केवळ सत्तेसाठी आहे. त्यांचा भगवा भेसळयुक्त असल्याने मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकवायचा हे जनताच ठरवेल. मुंबईत भाजपचा भेसळयुक्त झेंडा नाही, शिवसेनेचा शुद्ध शिवरायांचा भगवा फडकेल.

आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राऊतांना टोमणा मारला – शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबत शंका निर्माण झाली आहे. सेनेला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. हिंदुत्वाची गर्जना करणाऱ्या सेनेच्या भगव्याचे आता शुद्धीकरण करण्याची गरज आहे !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER