शिवसेनेची मुलूखमैदान तोफ धैर्यशील माने प्रवक्तेपदापासून वंचित

dhairyasheel sambhajirao mane - Maharastra Today

मुंबई :- शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने, तर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या सूचनेने शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांच्या काळात शिवसेनेत प्रवेश केलेल्या तिघा जणांना बक्षीस म्हणून प्रवक्तेपद देण्यात आले आहे. मात्र चौघा नेत्यांचा नव्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. शिवसेनेची मुलूखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे आणि राजकारणातील नवा ‘कोल्हापुरी पॅटर्न’ देशाला दाखवणारे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) यांना प्रवक्तेपदापासून वंचित ठेवण्यात आले आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह खासदार अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना नव्या यादीत स्थान मिळालेले नाही.

धैर्यशील माने हे कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना खासदार आहेत. नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हस्ते शिवबंधन बांधलं होतं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून मैदानात उतरलेले माजी खासदार राजू शेट्टी यांचा शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असलेल्या धैर्यशील माने यांनी पराभव केला होता. धैर्यशील माने यांनी तब्बल ९३ हजार ७८५ मतांनी विजय मिळवला होता. विशेष म्हणजे धैर्यशील माने यांनी खिलाडूवृत्ती दाखवत राजकारणातील नवा कोल्हापुरी पॅटर्न देशाला दाखवून दिला होता. मानेंनी थेट राजू शेट्टी यांचं घर गाठून त्यांच्या मातोश्रींचा आशीर्वाद घेतला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button