शिवसेनेचं मिशन नाशिक : महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी युद्धाची तयारी जोरात

Maharashtra Today

नाशिक : पुढच्या वर्षी नाशिक महापालिकेची निवडणूक(NMC) होऊ घातलेली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली असली तरी महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेनं कोरोनाकाळातच रणशिंग फुंकले होते. या निवडणुकीवर खुद्द शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी लक्ष घातलेले असून, त्यांनी संजय राऊत यांच्यावर सगळी जबाबदारी सोपवली आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीचे हे युद्ध जिंकण्यासाठी शिवसेनेनं पाच सदस्यीय समितीची घोषणा करून एक पाऊल पुढं टाकलं आहे. आता ही समिती पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर देत आहे.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी (Bhaurao Choudhary) यांनी पक्षप्रमुख यांनी केलेल्या सूचनेनुसार खासदार संजय राऊत यांच्या आदेशान्वये ही समिती स्थापन केली आहे.या समितीमुळे कधी नव्हे एवढे दिग्गज शिवसेनेच्या छत्राखाली नाशिकमध्ये एकत्र आले आहेत. या सगळ्यांची मोट बांधण्याचं दिव्य कार्य खासदार राऊत यांनी पार पाडलं. संभाव्य धोक्याची सूचना आधीच आली असावी, यामुळेच पक्षप्रमुखांनी ही समिती नेमली असे बोलले जात आहे.

वास्तविक, शिवसेनेत आदेश संस्कृती चालते. साधी शाखाप्रमुखाची नियुक्ती करायची झाली, तरी शिवसेनेच्या मुखपत्रातून त्यासंदर्भात घोषणा होते. मात्र नाशिकसारख्या सुसंस्कृत शहरात आणि अनेक रथी-महारथींना सोबत घेऊन महापालिकेत सत्ता मिळवायची झाल्यास सध्याचा मार्ग नक्कीच योग्य म्हणावा लागेल. भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेत सध्या अंतर्गत कलह आहे. भाजपला यापूर्वीच जळगाव आणि सांगलीत मोठा झटका बसला आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ता मिळविण्याची नामी संधी शिवसेनेला मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button