शिवसेनेचे मिशन गोवा : विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा; संजय राऊतांची घोषणा

Sanjay Raut

पणजी : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Elections) शिवसेनेने उमेदवार (Shiv Sena) उभे करण्याची घोषणा केली होती. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पाठिंबा दिल्यानंतर आता शिवसेनेने या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. मात्र आता शिवसेनेने गोवा विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. गोव्यात शिवसेना २० ते २५ जागांवर उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. त्यामुळे गोव्यात भाजपला (BJP) तगडे आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. गोव्यात शिवसेना लढणार आहे. आम्ही गोव्यातील २० ते २५ जागांवर लढणार आहे, असं राऊत यांनी आज स्पष्ट केलं. स्वबळावर लढल्याने पक्षाचा विस्तार होईल, असंही त्यांनी सांगितलं. गोवा विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत. पुढील वर्षी गोवा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. गोव्यात एकूण १० मुख्य राजकीय पक्ष आहेत. तिथे शिवसेनाही गेल्या अनेक वर्षांपासून गोवा विधानसभा निवडणुका लढवत आहे. महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्यासाठी आणि भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना नेहमीच गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत असते. सध्या गोव्यात भाजपचं सरकार आहे. गोव्यात काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष असला तरी भाजपने मित्रपक्षांसोबत आघाडी बनविण्यात बाजी मारल्याने काँग्रेसला सत्तेपासून वंचित राहावं लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER