
मुंबई : कोरोना संकटामुळे अनेकांना आपल्या नौकऱ्या गमवाव्या लागल्या . मुंबईसारख्या शहरातही बेरोजगारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून (Shivsena) विशेषत: मराठी तरुण-तरुणींसाठी एक मेगा प्लॅन आखण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मित होण्याची शक्यता आहे. महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली.
पेडणेकर म्हणाल्या की , मुंबईत 65 ठिकाणी स्ट्रीट हब उभारले जाणार आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत हे स्ट्रीट हब सुरु असतील. याठिकाणी स्ट्रीट फुडचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. या स्ट्रीट फूडमध्ये पारंपरिक मराठमोळ्या खाद्यपदार्थांना प्राधान्य दिले जाईल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला