शिवसेनेचा गुजराती बांधवांचा मेळावा स्थगित ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा (Shiv Sena) ‘डायरो’ आणि गुजराती बांधवांचा मेळावा स्थगित करण्यात आला आहे. कोरोनामुक्तीसाठी शासकीय यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवसेनेच्या गुजराती विभागातर्फे मुंबईमध्ये ‘जलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ ही घोषणा देत एकापाठोपाठ एक असे दोन मेळावे प्रचंड प्रमाणात यशस्वी झाले.

पहिला जलेबी फाफडा, दुसरा रासगरबा कमालीचा यशस्वी झाला. रविवार, २१ फेब्रुवारी २०२१ रोजी ‘डायरो’ हा लोकप्रिय कार्यक्रम शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी आयोजित केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (CM Uddhav Thackeray) नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. सर्व तयारी पूर्ण झाली होती.

परंतु गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मुंबई आणि परिसरात या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) यावर नियंत्रण आणण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न सुरू केले आहेत. नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER