आवताडेंच्या विजयासाठी शिवसेनेचे अदृश्य हात, जिल्हाप्रमुखाने बांधले होते ‘समर्थ बंधन’

Maharashtra Today

सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील झालेली पोटनिवडणुक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडेविजयी झाले. त्यांच्या विजयासाठी अनेकांनी हातभार लावले असून ते अदृश्य हात आता हळूहळू दिसू लागले आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आवताडे यांनी आमदारकीचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी १२ मार्च रोजी अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर आणि काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे होते. त्यावेळीआवताडे यांच्या मनगटावर खुद्द शिवसेनेचे (Shivsena) जिल्हाप्रमुख गणेश वानकर (Ganesh Wankar)समर्थ बंधन बांधले होते. आता आवताडे यांच्या विजयानंतर त्याची चर्चा आता सोलापूर जिल्ह्यात रंगू लागली आहे.

विधानसभा निवडणुकीतील सलग दोन पराभवानंतर पराभवाची हॅट्‌ट्रीक करण्यापेक्षा विजय प्राप्त करण्याच्या दृष्टीने समाधान आवताडे यांनी चंग बांधला होता. त्यादृष्टीने जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेत्यांना जवळ करण्याचादेखील प्रयत्न त्यांनी निवडणुकीपूर्वीच केला होता. त्यामध्ये काही त्यांच्या हाताला लागले, तर काही त्यांच्या विरोधात उभे ठाकले होते. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी १२ मार्च रोजी आवताडे यांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे दर्शन घेतले होते. या दर्शनाच्या वेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर व दक्षिण सोलापुरातील नेते आणि काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे हेदेखील त्यांच्यासोबत होते.

स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर शिवसेनेचे वानकर यांनी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या समाधान आवताडे यांच्या हातात समर्थ बंधन बांधले. त्यानंतर समाधान आवताडे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली. अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत आवताडे यांनी ३७३३ मताने विजय मिळवला. त्यांचे लग्नाच्या वाढदिवशी आमदारकीचे स्वप्न पूर्ण केले. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी घेतलेले दर्शन आणि हातात बांधलेले समर्थ बंधन हे आवताडेंना विजयासाठी फलदायी ठरल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. तर दुसरीकडे आवताडे यांच्या विजयामागे अदृश्य हात असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात रंगली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button