शिवसेनेचे हिंदुत्व म्हणजे सत्तेसाठी पांघरलेली शाल – आशिष शेलार

Ashish Shelar

मुंबई :- सरसंघचालक मोहन भागवत यांची ती व्याख्या म्हणजे हिंदुत्वाची खरी त्वचा आहे. मात्र, शिवसेनेने (Shivsena) सत्तेसाठी या त्वचेचा त्याग केला. आता शिवसेनेच्या अंगावर केवळ हिंदुत्वाची शाल पांघरलेली आहे. त्यामुळे हिंदुत्वाची त्वचा आणि शाल यांची तुलना होऊच शकत नाही, असे वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाचा दाखल देत भाजपच्या नेत्यांना टोले लगावले होते. हिंदुत्व हे पूजाअर्चा किंवा मंदिरापर्यंत मर्यादित नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. या टीकेला आशिष शेलार यांनी सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत प्रत्युत्तर दिले.

उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व भेसळयुक्त झाले आहे. त्यांना आमच्याकडून आणि काळ्या टोपीकडून हिंदुत्वाचं सर्टिफिकेट घ्यावे लागले. तसेच टाळ्या आणि थाळ्यांचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नव्हता. ते केवळ कोरोना योद्ध्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी करण्यात आले होते, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER