शिवसेनेचा मदतीचा हात बनली अनाथांचा नाथ, कामशेतच्या एकता निराधार संघाला केली मदत

Maharashtra Today

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे .

सामाजिक बांधिलकीतून समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या निराधार, अनाथांना आधार देण्याचे काम शिवसेना करत आहे. कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या लोणावळ्याजवळील कामशेतमधील एकता निराधार संघ या संस्थेला एक महिना पुरेल, इतक्या अन्न-धान्याची मदत करून शिवसेनेने त्यांना मदतीचा हात (Shiv Sena’s helping hand became the father of orphans)दिला आहे. शिवसेनेच्या या मदतीमुळे अनाथांच्या चेहऱयावर हसू फुलले आहे.

लोणावळातील कामशेत येथील एकता निराधार संघाच्या अडचणी एका मराठी वृत्तवाहिनीने मांडल्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी स्वतः कामशेत येथे जाऊन या संस्थेला एक महिना पुरेल इतके अन्न-धान्य आणि किराणा माल दिला.
सरकार त्यांच्या अडचणीं संदर्भात निर्णय घेत नाही तोपर्यंत दर महिन्याला त्यांना जाणीव ट्रस्टच्या माध्यमातून अन्न-धान्य पुरवले जाईल, असे आश्वासनही सावंत यांनी दिले.

दरम्यान एकता निराधार (Ekta Niradhar Sangh ) संघात 18 वर्षे पुढील तरुण मुले-मुली राहत असून त्यांचा सांभाळ संस्थेचे संचालक निखिल नाशिककर करत आहेत. मात्र, 18 वर्षे पूर्ण झाल्यावरही हे तरुण मतदान हक्क, नोकरी यापासून वंचित आहेत. नाव नाही, गाव नाही त्यामुळे रेशनकार्ड आणि आधारकार्डपासून हे सर्व वंचित आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण तसेच इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांमध्येही प्रवेश मिळत नाही. त्यांच्या या समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारकडे या समस्या सोडवण्यासाठी आणि या अनाथांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, असेही सावंत यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button