जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा, भाजपची सत्ता खेचून महापौरपद शिवसेनेकडे

Jayashree Mahajan Maharashtra Today

जळगाव :- जळगाव महापालिकेतील (Jalgaon Municipal Corporation) महापौर आणि उपमहापौराच्या निवडणुकीत शिवसेनेने (Shivsena) सांगली पॅटर्न राबवून भाजपच्या हातात असलेली महापालिका आपल्या ताब्यात घेतली आहे. आधीपासून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार भाजपचे नगरसेवक फुटले आणि शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार जयश्री महाजन (Jayashree Mahajan) विजयी झाल्या आहेत. महाजन याना ४५ तर भाजपच्या उमेदवार प्रतिभा कापसे यांना ३० मतं मिळाली. तर उपमहापौर म्हणून भाजपमधील बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांचे नाव सर्वात पुढे आहे.

जळगाव महापालिकेत आज ऑनलाइन पद्धतीने महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक संपन्न झाली. भाजपच्या ३० नगरसेवकांचा एक गट हा निवडणूक होण्या अगोदरच शिवसेनेला जाऊन मिळाला होता. त्यामुळे आज जळगावात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता होती. शिवसेनेकडून महापौरपदासाठी जयश्री महाजन तर भाजप मधील बंडखोर उमेदवार उपमहापौरपदासाठी कुलभूषण पाटील यांचे नाव निश्चित केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER