कोरोनामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा होणार ऑनलाईन ?

शिवसेना - दसरा मेळावा

मुंबई : शिवसेनेचा (Shiv Sena) ऐतिहासिक दसरा मेळावा यंदा कोरोनामुळे (Corona) अडचणीत आला आहे. लोकांचा जीव धोक्यात न घालण्याचा शिवसेनेचा विचार आहे. विचारांचे सोने मैदानात लुटण्याऐवजी सोशल मीडियातून कसे लुटता येईल, या दृष्टीने शिवसेना तयारी करत असल्याची चर्चा आहे. (Shivsena Dussehra Melava May celebrate through Social Media)

ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदी बसली आहे. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दसरा मेळावा धूमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सवांवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या सोहळ्याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.

राज्यात ‘अनलॉक’ (Unlock) सुरू असले तरी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जात आहेत. राज्य सरकारने लोकलसेवा, जिम, सिनेमागृह अजून सुरू केलेले नाहीत. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर राज्यभरातून होणारी गर्दी टाळण्याकडे शिवसेना नेतृत्वाचा कल आहे.

दसरा २५ ऑक्टोबरला आहे. दसरा मेळावा सोशल मीडियाच्या माध्यमातून पार पाडावा. त्यामुळे पक्षाची स्थापनेपासून सुरू असलेली परंपरा खंडित होणार नाही, असा शिवसेना नेतृत्वाचा प्रयत्न आहे. दरम्यान यापूर्वी पावसामुळे दसरा मेळावा रद्द करावा लागला होता. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा नेमका कसा होणार याकडे शिवसैनिकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER