मुंबईचा एकुलता कारभारी होण्याचे शिवसेनेचे स्वप्न !

मुंबईतील विविध यंत्रणांमुळे विकासात अडथळा येत असल्याचे कारण पुढे करत मुंबई मनपा आयुक्तांनी महापालिकेच्या नेतृत्वाखाली सर्व नियोजन यंत्रणा एकत्र आणण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. मात्र या प्रस्तावाआडून मुंबईचा एकुलता कारभारी होण्याचे शिवसेनेचे (Shivsena) स्वप्न असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

त्यामुळे या प्रस्तावावर आता राष्ट्रवादी आणि भाजपाने विरोध दर्शवला आहे.

मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्राची धुरा म्हाडाच्या हाती असून येथील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी एसआरएवर सोपवण्यात आली आहे. याउलट २००० साली कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मेट्रोसारखे महत्त्वाचे प्रकल्प एमएमआरडीएच्या ताब्यात दिले होते. त्यामुळे प्रत्येक यंत्रणेकडे नवीन जबाबदारी सोपवल्याने त्या त्या यंत्रणांना महत्त्व प्राप्त झाले होते. आता मात्र, शिवसेनेने सर्वच प्रकल्प एकहाती ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे शिवसेनेला मायानगरी मुंबईवर एकाधिकारशाही गाजवायचे स्वप्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान १९७० सालापासून मुंबई महापालिकेच्या चाव्या शिवसेनेकडे असल्या तरी इतर यंत्रणा राज्य शासनाच्या ताब्यात असल्याने शिवसेनेला मुंबईचा एकहाती कारभारी होता आलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER