बिहारमध्ये शिवसेनेचे डिपॉझिटच जप्त; आता कुठे गेला उद्धव ठाकरे आणि राऊतांचा चमत्कार : भाजप नेत्याचा टोला

Kirit Somaiya - Sanjay Raut - CM Uddhav Thackeray

मुंबई :- बिहारमध्ये (Bihar) शिवसेनेच्या (Shiv Sena) सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. आपापल्या मतदारसंघात त्यांना एक टक्काही मते पडली नाहीत. मग आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांचा चमत्कार कुठे गेला, असा टोला भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी लगावला आहे.

भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने बिहारमध्ये 23 जागांवर उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीसाठी शिवसेनेला ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे चिन्ह मिळाले होते. त्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी प्रचारही केला होता. मात्र, एकूण 23 जागांपैकी 21 जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली होती.

दरम्यान किरीट सोमय्या यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून यावर काय प्रतिक्रिया देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER