महाराष्ट्रात ‘तौत्के’चे संकट, पोलीस महासंचालक सुटीवर ! कारवाई करा; शिवसेनेची मागणी

मुंबई : महाराष्ट्रात ‘तौत्के’ चक्रीवादळाचे (tauktae cyclone) संकट असताना पोलीस महासंचालक संजय पांडे सुट्टीवर गेले आहेत. संजय पांडे (Sanjay Pandey) परवानगी न घेताच चंदिगढला सुट्टीवर गेल्याची माहिती आहे. याबाबत शिवसेना (Shivsena) नाराज पक्षाने केली आहे. याआधीही संजय पांडे आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणले गेले होते, हे उल्लेखनीय.

संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी बदली झाल्यानंतर संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते पत्र

पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. माझ्यावर नेहमी अन्याय झाल्याची तक्रार त्यांनी केली होती. क्षमता असूनही दरवेळी मला वगळण्यात आले. पात्रता असतानाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद मिळाले नाही, असंही त्यांनी म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button