मनसेकडून शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम, कोल्हापूरचा बडा नेता समर्थकांसह मनसेत

supporters in MNS - Maharastra Today

मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठ्याप्रमाणात इनकमिंग होताना दिसून येत आहे. इतर पक्षातील नेत्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. विशेष म्हणजे यात शिवसेनेच्या पधाधिकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातच आता मनसेने शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील शिवसेनेच्या बडा नेता मनसेच्या गळाला लागला असून, त्यांनी आजच मनसेत प्रवेश केला. त्यामुळे कोल्हापूरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेना कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख परशुराम बामणे यांनी आज आपल्या असंख्य समर्थकांसह राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी येऊन मनसेत अधिकृतपणे प्रवेश केला. राज ठाकरे यांनी त्यांना मनसेचा दुप्पटा गळ्यात घालून प्रवेश दिला. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी त्यांना मोठी जबाबदारी सोपवली आहे. मनसेच्या जनहित आणि विधी कक्षाच्या शिफारशीनुसार राज ठाकरे यांनी बामणे यांची कोल्हापूर-ग्रामीण विभागासाठी जनहित आणि विधी कक्षाच्या ‘जिल्हाध्यक्ष’पदी नेमणूक केली. तसेच पक्षाच्या वाढीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER