शिवसेनेचा काँग्रेसला मोठा धक्का : औरंगाबाद जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवबंधनात

CM Uddhav Thackeray - Nitin Patil - Maharashtra Today

औरंगाबाद : शिवसेनेने (Shiv Sena) आज काँग्रेसला (Congress) मोठा धक्का दिला आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या माध्यमातून शिवसेनेनं काँग्रेसला मोठा धक्का देत औरंगाबाद जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील (Nitin Patil) यांना शिवबंधनात अडकवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत नितीन पाटील यांनी आज हाती शिवबंधन बांधलं. नितीन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अब्दुल सत्तार यांचे प्रयत्न अखेर यशस्वी ठरले. शेवटी आज नितीन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली जिल्हा बँक आता शिवसेनेच्या ताब्यात आली आहे. जिल्ह्यातील एक मोठी सहकारी संस्था ताब्यात आल्यामुळे शिवसेनेची ताकद आणखीनच वाढली आहे. आता जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील यांना शिवसेनेत प्रवेश देत सत्तार यांनी राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला मोठा झटका दिला आहे.

जिल्हा बँक निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला होता. माजी विधानसभा अध्यक्ष आणि बँकेचे संचालक असलेले हरिभाऊ बागडे यांना पराभवाचा धक्का बसला. या निवडणुकीत अनेक अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या बागडेंचा पराभव हा जिल्ह्याच्या राजकारणाचं बदललेलं वार असल्याची चर्चा तेव्हा सुरू होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button