शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; शहापूर भाजप युवा नेत्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

BJP youth leader and hundreds of workers in Shiv Sena

ठाणे : शिवसेनेने (Shiv Sena) आज भाजपला (BJP) मोठा धक्का दिला आहे. ठाणे जिल्ह्यात येणाऱ्या शहापूर भाजप युवा शहर अध्यक्ष विनोद केणे यांच्या नेतृत्वाखाली शहापूर नगरपंचायतमधील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा (Pandurang Barora) यांचा आज वाढदिवस असल्याने एका छोटेखानी कार्यक्रमात हा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी शहापूर भाजप युवा शहर अध्यक्ष विनोद केणे यांच्या नेतृत्वाखाली शहापूर नगरपंचायत हद्दीमधील वार्ड क्रमांक- १३ व १४ मधील भारतीय जनता पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधले. यावेळी ठाणे जिल्हा ग्रामीण युवासेना अध्यक्ष प्रभुदास नाईक, माजी आमदार पांडुरंग बरोरा, तालुकाध्यक्ष मारुती धीर्डे उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button