महापौर-उपमहापौरांच्या खुर्चीवरून उल्हासनगर मनपात शिवसेनेचा संताप

ulhasnagar municipal corporation

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत झालेल्या महासभेत महापौर (Ulhasnagar Municipal Corporation Mayer) आणि उपमहापौर (Deputy Mayer) यांच्या खुर्च्या सारख्या असल्याने राजकारण तापले. शिवसेनेने हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला. शिवसेनेच्या नगरसेवकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. महापालिकेत शिवसेनेचा महापौर तर रिपाइं आठवले (RPI Athavale Group) गटाचा उपमहापौर आहे.

कोरोनामुळे सुमारे तीन महिन्यानंतर उल्हासनगर महापालिकेची ऑनलाइन महासभा झाली. सभागृहात शिवसेनेच्या महापौर लीलाबाई आशान आणि उपमहापौर भगवान भालेराव यांची एक सारखी आसन व्यवस्था होती. महासभा पार पडल्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी यावर आक्षेप घेतला.

महापौर हे महापालिकेतील सर्वोच्च पद आहे. उपमहापौरांनी देखील महापौरांच्या खुर्चीसारखी खुर्ची आणून महापौरपदाचा अपमान केला तो कदापी सहन केला जाणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला.

ऑनलाइन झालेल्या महासभेत नगरसेवकांना बोलण्यापासून रोखणे, बोलू न देणे, ही उपमहापौरांची दादागिरी शिवसेना सहन करणार नाही, असा इशारा देखील राजेंद्र चौधरी यांनी दिला आहे.

उपमहापौर भगवान भालेराव म्हणालेत, महापौरांचा अपमान केला नाही. प्रत्येक महापालिकेत महापौर, उपमहापौर, आयुक्त आणि सचिव यांच्या खुर्च्या एक सारख्या असतात. महापौर आणि उपमहापौरांच्या खुर्च्या वेगवेगळ्या असाव्यात, असा नियम असेल तर त्यांनी दाखवावा.

गेल्या काही दिवसात माझी शिवसेनेच्या नेत्यांशी जवळीक वाढल्याने काहींच्या पोटात दुखते आहे त्यामुळे हा मुद्दा उकरून काढण्यात आला.

भाजपाला महापौर, उपमहापौर पदापासून आणि सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भाजपाचे काही नगरसेवक एकत्र आले आणि त्यांनी शिवसेनेच्या बाजूने मतदान केले होते. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचा महापौर आणि रिपाइं आठवले (RPI Athavale Group) गटाचा उपमहापौर आहे, हे उल्लेखनीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER