‘एम्स’च्या रिपोर्टने महाराष्ट्राच्या बदनामीचा कट उधळला : शिवसेना

Amey Ghole - Sushant Singh Rajput - AIIMS

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाला आता नवे वळण आले आहे . एम्स हॉस्पिटलने सुशांतने आत्महत्याच केली, असे शिक्कामोर्तब केले आहे. यावरून शिवसेनेने (Shiv Sena) आता आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्राची बदनामी करण्याचा कट रचला गेला, मात्र एम्सच्या अहवालामुळे महाराष्ट्राची प्रतिमा पुन्हा एकदा सिद्ध झाली, असं शिवसेना नगरसेवक आणि आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले (Amey Ghole) यांनी म्हटले आहे .

दिल्लीच्या एम्स रुग्णालयाने सुशांत सिंहची आत्महत्या झाल्याचा अहवाल दिला आहे. या अहवालामुळे राज्य सरकार मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस योग्य तपास करत होती हे सिद्ध होते . पण काहींनी महाराष्ट्राची बदनामी करण्याचा कट रचला गेला होता. एमच्या अहवालामुळे महाराष्ट्राची प्रतिमा पुन्हा एकदा सिद्ध झाली”, असे अमेय घोले म्हणाले.

दरम्यान 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील वांद्रे परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेतला होता. सुरुवातील या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केला होता. मुंबई पोलिसांनी सुशांतने आत्महत्या केली, असं स्पष्ट केले होते. परंतु, सुशांतने आत्महत्या केली नसून हत्या केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर भाजपच्या (BJP) नेत्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. अखेर हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आणि सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या तपासाला सीबीआयने सुरुवात केली आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER