उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीसाठी दुसऱ्या दिवशीही शिवसेनेचं आंदोलन

ShivSena Flags

मुंबई : हाथरसमध्ये (Hathras) दलित मुलीवर झालेला बलात्कार, तिची हत्या आणि त्यानंतरचा घटनाक्रम बघता, उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणीसलग दुसऱ्या दिवशीही शिवसेनेने (Shiv Sena) केली. शुक्रवारी चर्चगेट रेल्वेस्थानकासमोर आंदोलन करण्यात आले होते. तर आज दादरच्या शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यात येत आहे.

दरम्यान, हाथरसमधील घटना, त्यानंतर काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांची केलेली अडवणूक, माध्यमांच्या प्रतिनिधींना रोखले जाणे हा लोकशाहीवरील बलात्कार असल्याची टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करून त्यांनी हाथरसच्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मौन का बाळगले आहे, असा सवाल केला. तर, शिवेसनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी, हाथरसमधील घटनेप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करावा आणि मुंबई पोलिसांना त्या ठिकाणी तपासासाठी पाठवावे, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडे केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER