शिवसेनेची आक्रमक भूमिका, मनसेच्या एकमेव नगराध्यक्षाविरुद्ध अपात्रतेचा ठराव

Vaibhav Khedekar - Ramdas Kadam

रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील खेड नगरपालिकेत शिवसेना (Shiv Sena) विरुद्ध मनसे (MNS) असा सामना रंगला आहे. महाराष्ट्रातील मनसेचा एकमेव नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांच्याविरोधात डिझेल घोटाळा केल्याचा आरोप करत अपात्रतेसंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. खेड हे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे होम पिच आहे.

मनसेचे सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याविरोधात अपात्रतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि गटनेत्यांनी हा प्रस्ताव दाखल केला. नगराध्यक्ष पदाचा गैरवापर करत खेडेकरांनी 11 कामांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. खेडेकरांच्या भ्रष्टाचारांची कुंडली पुराव्यासकट जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्याचंही रामदास कदमांनी सांगितलं. तसेच खासगी वाहनात डिझेल भरत खेडेकरांनी 77 लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केलाय. शहराच्या विविध विकास कामांच्या अंतिम बिलांवर नगराध्यक्षांनी एकट्याच्या सहीने पैसे दिल्याचं सुद्धा रामदास कदम यांच्याकडून सांगण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER