शिवसैनिकांनी येडियुरप्पांच्या पुतळ्याला मारले जोडे!

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न वरून भाजप-शिवसेनेत आरोप – प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु आहेत . बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळला होता. त्याचे पडसाद आता कोल्हापूरमध्ये उमटले आहे. सेनेच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले .

‘वाईट नेत्याला साथ देणे महाराष्ट्राची चूक’, अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न वरून कन्नड संघटनांचा बेळगावमध्ये धिंगाणा घातला होता. यावेळी कन्नड रक्षण वेदिकेच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. तसंच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळला होता. त्यानंतर कोल्हापूरमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं आहे. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलं आणि पुतळ्याला काळी शाई फासली.

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना भाजप पाठीशी घालत असल्याचा आरोप करत कर्नाटक सरकारचा युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार विरोधात घोषणाबाजीही केली. दरम्यान, काही अज्ञात व्यक्तींनी कर्नाटकच्या बसेसवर दगडफेक केली आहे.