अखेर शिवसेना फुटायला सुरूवात, आघाडीत सहभागी झाल्याने नाराज शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश

MNS

मुंबई : भाजपसोबत (BJP) काडीमोड करत मतभेद असलेल्या काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेत आता फूट पडायला सुरुवात झाली आहे. अविचारी पक्षासोबत सरकार स्थापन केल्याने नाराज शिव सैनिकांनी आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करण्याचे निश्चित केले आहे. आता शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असून, ज राज ठाकरेंच्या उपस्थितीत औरंगाबादेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. ऐन औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मनसेने शिवसेनेला मोठा जबर धक्का दिल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे औरंगाबादेतील पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देखील आज राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) उपस्थितीत प्रवेश केला असल्याचे मनसेने (MNS) अधिकृतरीत्या सांगितले.

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे अगदी जवळचे समजले जाणारे सिडको हडको भागात प्राबल्य असणारे राजू खरे, भाजपाचे माजी नगरसेवक नामदेव बेंद्रे,शिवसेना माजी उपशहर प्रमुख व पतित पावन संघटनेचे अध्यक्ष पै.प्रविण कडपें, जिल्हा संघटक अंकुश क्षीरसागर, कार्याध्यक्ष राजू परळीकर व शिवसेनेचे प्रशांत जोशी,रमेश मोदाणी, अरविंद जाधव यांच्यासह अनेकांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे, अशी माहिती औरंगबादचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी दिली. दरम्यान, यापुढेही शिवसेनेला आश्याच प्रकारचे अनेक धक्के मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER