
रायगड :- सरकार स्थापनेनंतर स्थानिक पातळीवरच्या पहिल्याच निवडणुका होत आहेत. स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेने बाजी मारलेली दिसत आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील पहिल्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. नऊ जागांपैकी शिवसेनेचे (Shiv Sena) पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पनवेल तालुक्यामध्ये २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. काही दिवसाआधीच गिरवले गावातील ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता व आता शिवसेनेला यश मिळवून देण्यात ग्रामस्थ यशस्वी झालॆ आहेत.
शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील (Babandada Patil) यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला