‘शिवसेना आता पश्चिम बंगालमध्ये मोठा रेकॉर्ड करेल’, फडणवीसांचा खोचक टोला

devendra fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई :- येत्या काही दिवसांमध्ये पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) मध्ये दररोज राजकीय वातावरण तापत असताना शिवसेनेने (Shiv Sena) पश्चिम बंगालमध्ये देखील निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सुद्धा पश्चिम बंगालचा दौरा करू शकतात. शिवसेना कोलकाता, हुगळी, दमदमसह अनेक भागांत आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकते. तसेच निवडणूक लढण्याचा अंतिम निर्णय 29 जानेवारीला पक्षाच्या बैठकीत होणार आहे.

यासंदर्भात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रश्न केला असता त्यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला. ‘शिवसेना पश्चिम बंगालमध्ये लढणार ही आनंदाची गोष्ट आहे. कारण शिवसेनेनं एक रेकॉर्ड बिहारमध्ये तयार केलं आहे. नोटापेक्षा कमी मतं मिळवण्याचा बिहारमधील रेकॉर्ड आप (आम आदमी पक्ष) कडे होता. हा रेकॉर्ड शिवसेनेनं मोडला आहे. आता बंगालमध्ये ह्यापेक्षा मोठा रेकॉर्ड शिवसेना तयार करेल,’ अशी उपरोधिक टीका फडणवीसांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा : मुलुंडच्या तोतऱ्या नेत्याने भ्रष्ट नेत्यांचे पुरावे दिले, ईडीने त्याची सुरनळी केली काय? – शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER