
मुंबई :- आधी दुसऱ्या राज्यात शिवसेना (Shiv Sena) मोठ्या प्रमाणात होती; पण त्यावेळी शिवसेनेने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने आपले लोक भाजपामध्ये (BJP) गेले, नाही तर आज वेगळी परिस्थिती असती. पण, भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्य संग्रामात आरएसएस कुठेही नव्हती, हा काँग्रेसच्या पठडीतला आरोपही यावेळी त्यांनी केला.
राम मंदिराच्या निधी संकलनावर टीका
ते वर्षा बंगल्यावर राज्यातील सर्व जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांच्या समोर बोलत होते. राम मंदिराच्या निधी संकलनावर टीका करताना ठाकरे म्हणालेत, रामाच्या नावाने काही लोक घरोघरी पोहचत आहेत, पण ते पैसे मागण्यासाठी. आपल्याला तसे करायचे नाही.
ही बातमी पण वाचा : शिवसेना गावागावात पोहोचवा ; उद्धव ठाकरेंचे पॉवरफुल आदेश
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला