
मुंबई :- महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) शिवसेनेच्या (Shiv Sena) कोट्यातून ऊर्मिला मातोंडकर यांची राज्यपाल नियुक्त सदस्यत्वाची शिफारस केली आहे. यावर अद्याप राजभवनातून निर्णय आलेला नाही. यापार्श्वभूमीवर अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विधान परिषदेची आमदारकी मिळाली नाही तरी शिवसेनेचे काम करतच राहणार आहे. कोणत्याही पदासाठी मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. ज्याप्रमाणे बॉलीवूडमध्ये (Bollywood) लोकांनी मला स्टार बनवले त्याचप्रमाणे राजकारणात लाेकांसाठी नेता बनायचे आहे. एसी रूममध्ये बसून टि्वट करणारी नेता बनायची माझी इच्छा नाही, असे त्या म्हणाल्या आहेत.
काँग्रेसचे केलेल्या टीकेसंदर्भात मातोंडकर यांनी यावेळी भाष्य केले. पक्ष सोडतानाही मी काँग्रेसवर टीका केली नव्हती. त्यामुळे आता काही बोलण्याचा तर प्रश्नच उद्वभवत नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. पराभवामुळे काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. माझ्यासाठी माझ्या अंतरात्म्याचा आवाज महत्त्वाचा असल्याचे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाचेही त्यांनी तोंडभरून कौतुक केले.
ही बातमी पण वाचा : भाजपला पुन्हा धक्का ; दिग्गज नेत्या अस्मिता पाटील यांचा पक्षाला रामराम ; राष्ट्रवादी, शिवसेनेत प्रवेशाची शक्यता
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला