‘बिहारमध्ये स्थानिक पक्षांना सोबत घेऊन शिवसेना निवडणूक लढवणार’ – संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई :- आगामी बिहार निवडणुकीसाठी (Bihar elections) सर्वच पक्ष जोमाने कमला लागले आहेत. या निवडणुकीत ५० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (Mahavikas Aghadi) एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यासंदर्भात शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र आता याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माहिती दिली.

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा एकत्रित लढण्याचा अदयाप कुठलाही विचार झालेला नाही. त्याऐवजी शिवसेना बिहारमधील स्थानिक पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याला प्राधान्य देईल. बिहारचे अनेक स्थानिक पक्ष आमच्यासोबत निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. बिहारमधील नेते पप्पू यादव यांनी शिवसेनेसोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. मी लवकरच पाटण्याला जाणार आहे. त्यावेळी यासंदर्भात चर्चा केली जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

तसेच बिहारमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना निवडणूक लढवत आहे का? असा प्रश्नही राऊत यांना विचारण्यात आला. मात्र, बिहारमध्ये शिवसेनेची तेवढी ताकद नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले. परंतु, शिवसेना ४० ते ५० जागांवर निवडणूक लढवले, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आरेतील मेट्रोची कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एकप्रकारे पर्यावरणाचे रक्षण केले आहे. ते एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील इतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत केले पाहिजे, असे राऊत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी पर्यावरण रक्षणाची भाषा करतात. त्यांच्या कार्यकाळात गंगा शुद्धीकरण, सेव्ह टायगर आणि जंगल वाचवण्यासाठीचे इतर उपक्रम हाती घेण्यात आले. त्यामुळे आरेतील जंगल वाचवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे पंतप्रधान मोदी यांचाच राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेला आहे. उद्धव ठाकरे यांनी आरेतील जंगलाचे क्षेत्र ६०० एकरावरुन ८०० एकरापर्यंत वाढवले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : ‘ठाकरे’ शब्दाला पक्के, हे सिद्ध झाले – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER