सत्ता असो वा नसो शिवसेना महत्वाची, पुण्यात ८० जागा लढवणार; संजय राऊतांचा एल्गार

Sanjay Raut

मुंबई : सत्ता असो वा नसो शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्वाचा पक्ष आहे. सर्वाना आपला पक्ष वाढवण्याचा नैतिक अधिकार आहे. आगामी पुणे महापालिका निडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असो वा नसो शिवसेना कोणत्याही परिस्थितीत ८० जागा लढवणार असल्याची घोषणा आज शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत केली. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिंकावं ही आमची भूमिका आहे. त्यासाठी जे जे करावं लागेल ते करणार आहोत, असेही राहुल यांनी यावेळी स्पष्ट केले.

ही बातमी पण वाचा:- पाठीत खंजीर खुपसण्याची शिवसेनेला सवय नाही; मात्र…संजय राऊतांचा पुन्हा इशारा

ते पुढे म्हणाले, महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र आले आहेत. सरकार स्थापनेपूर्वी काही सामान-किमान कार्यक्रमाची रुपरेषा ठरवण्यात आली होती. ती पाळायला हवी. खेड सारखे प्रकार घडायला नको होते. राष्ट्रवादीच्या आमदाराने शिवसेनेच्या सदस्यांना फोडण्याचे काम केले. हे महाविकास आघाडीच्या हिताचे नसून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधी लक्ष घालावे, अशी तंबीही अजित पवार यांनी दिली.

आमच्या पक्षाच्या प्रमुख लोकांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी या संदर्भात चर्चा करून कल्पना दिली होती. की, असं काही घडत आहे व आपण त्यामध्ये लक्ष घालावं. मी काल देखील सांगितलं, की स्थानिक पातळीवर राजकारण होत असतं कुरघोड्या करत असतात, पण त्या कोणत्या स्तरापर्यंत आपण करू शकतो. हे ठरवायला हवं. अशी संधी आम्हालाही मिळेल पण आम्ही ते करणार नाही. जर आम्हाला अशी संधी मिळाली तर आम्ही नक्कीच या संदर्भात त्यांचे प्रदेशाध्यक्ष किंवा अजित पवार यांच्याशी बोलू व सांगू की तुमची लोकं आमच्यापर्यंत आले आहेत व त्यांना तुमचा पक्ष सोडायचा आहे आणि आमच्याकडे यायचं आहे. तुम्ही तुमच्या लोकांना सांगा. हे आम्ही सांगू शकतो, असं संजय राऊत म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री हे आमचे शिवसेनेचे जरी असले तरी आज आम्ही त्यांना महाविकासआघाडीचे मुख्यमंत्री म्हणतो. हीच भूमिका ठेवून जर सगळ्यांनी काम केलं तर हे सरकार पूर्ण काळ चालेल व त्या पलिकडे जाऊन देखील आपल्याला महाराष्ट्राची सत्ता टिकवता येईल. काल मी खेडला गेलो ते मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसारच गेलो होतो. जे आमचे पक्ष प्रमुख आहेत. त्यांचीच भूमिका मी तिथं मांडली. राज्यात जिथं जिथं शिवसेनेला त्रास होईल, त्रास देण्याचा प्रयत्न होईल तिथं मी जाणार. शेवटी माझं नातं माझ्या पक्षाशी आहे, शिवसैनिकांशी आहे. माझा पक्ष टिकवणं व शिवसैनिकांना जर कुणी त्रास देत असेल, जर कुणी शिवसेनेचे पाय खेचत असेल. तर नक्कीच तिथं जाऊन आम्हाला उभं राहावं लागेल. सत्ता असेल किंवा नसेल याच्याशी काही आम्हाला पडलेलं नाही. सत्ता असली किंवा नसली तरी शिवसेना आमच्यासाठी महत्वाची आहे. असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावर बोलताना राऊत यांनी नाना पटोले यांच्यावरही निशाणा साधला. काँग्रेस स्वबळावर जर सत्तेत येणार असेल तर आमच्या शुभेच्छा आहेत. काँग्रेसने स्वबळावर मोदी सरकारचा पराभव करुन केंद्रात सत्ता मिळवावी, असे आव्हानही त्यांनी पटोले यांना दिले. तसेच अनलॉकसंदर्भात केलेल्या घोषणेवरुन त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कानपिचक्या घेतल्या. काही जणांना लोकांमध्ये जाण्याची घाई पडलेली असते. मात्र मुख्यमंत्र्यांनी अनलॉकबाबत योग्य आणि दिलासा देणारा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने सर्वच घटक सुखावतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button