नारायण राणेंना शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील – अशोक चव्हाण

Ashok Chavan - Narayan Rane - CM Uddhav Thackeray

औरंगाबाद : नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला शिवसैनिकच (Shiv Sena) योग्य वेळी उत्तर देलीत, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानीची पाहणी करण्यासाठी अशोक चव्हाण औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याविषयात मला काही बोलायचे नाही. पण त्यांनी केलेल्या विधानांवर कोणी प्रतिक्रिया देत नाही, याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या. त्यांची किंमत काय आहे. विषय शिवसेनेचा आहे. शिवसैनिकच योग्यवेळी त्यांना उत्तर देतील कारण ते पूर्वश्रमीचे शिवसैनिक आहेत.

दरम्यान मराठा आरक्षणावरही (Maratha Reservation) त्यांनी भाष्य केले . मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची (Supreme Court) अंतरिम स्थगिती आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आरक्षण टिकावे आणि सुनावणी पूर्ण घटनापीठासमोर व्हावी, अशी राज्य सरकारचीही भूमिका आहे. मंगळवारी (ता. २७) सुनावणी आधीच्या बेंचसमोर होणे सरकारला अपेक्षीत नव्हते. ती संविधानिक बेंचसमोर व्हावी, अशी विनंती सरकारच्या वतीने करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER