शिवसेनाही नाणारला पाठिंबा देईल; नितेश राणेंचा आरोप

Nitesh Rane

मुंबई : भाजपा (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नाणार प्रकल्पास पाठिंबा दिल्याबद्दल मनसेचे स्वागत केले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेची कंपनीसोबत डिलिंग सुरू आहे. आकडा फिक्स होताच शिवसेना नाणारला पाठिंबा देईल, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाणारला पाठिंबा दिला आहे. नाणार प्रकल्प पूर्ण करण्याची मागणीही केली आहे. पहिल्या दिवसापासून भाजपाने नाणारला पाठिंबा दिला. यामुळे जनतेची भावना बदलली आहे. कोकणात रोजगार आणि विकासाचा प्रकल्प व्हावा, असे लोकांना वाटत आहे. स्थानिकांनी राज ठाकरे यांना भूमिका सांगितल्यामुळे यांनीही नाणार प्रकल्पाला पाठिंबा दिला असेल. यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो, असे नितेश यांनी सांगितले.

शिवसेनेचे आमदार राजन साळवी हे गेल्या १५ वर्षांपासून आमदार आहेत. केवळ त्यांनी लोकांच्या भावना समजून आधार दिला आहे. हा प्रकल्प व्हावा असे शिवसैनिकांनाही वाटत आहे. शिवसेनेने स्थानिकांच्या भूमिकेचा आदर केला पाहिजे. पण मुख्यमंत्री स्वत:च्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे ऐकत नाहीत. नाणार कंपनीसोबत त्यांची चर्चा सुरू आहे. आकडा निश्चित होईपर्यंत सेनेचा या प्रकल्पाला विरोध राहील. आकडा फिक्स होईल तेव्हा ते पाठिंबा देतील, अशी टीकाही त्यांनी केली. मातोश्री आणि स्थानिक जनतेचा काहीच संपर्क उरलेला नाही. मातोश्रीचा जनतेशी संपर्क तुटला आहे. कोविड काळात आपण ते पाहिले आहे, असेही ते म्हणाले.

मनसुख हिरेन प्रकरणाचा रिपोर्ट योग्य नाही
मनसुख हिरेन प्रकरणावरही यावेळी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हिरेन आत्महत्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे. हा रिपोर्ट योग्य नाही. राज्यातील पोस्टमार्टम विभागावरच माझा आक्षेप आहे. पोस्टमार्ट विभाग राजकीय शाखा बनला आहे, असा आरोपही त्यांनी केला. दिशा सालियन प्रकरणाचा रिपोर्ट अजून आलेला नाही. त्यामुळे हिरेन कुटुंबीयांनी या रिपोर्टवर विश्वास का ठेवावा? हिरेन यांचा रिपोर्ट संशयास्पद आहे. सरकारच्या काळात आत्महत्या किंवा घटनांबाबतच्या कागदपत्रांमध्ये हेराफेरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

कलानगरमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन
वरळीत रात्री उशिरापर्यंत चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. यावरूनही त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. दिशा पटानी आणि इतर कलाकारांना सवलती का मिळतात, हे सांगायची गरज नाही. तसेच कलानगरमध्ये दोन कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्री राहात असताना एका बारमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन कसे केले जाते? हे कोणाच्या पाठिंब्याने होते? असाही सवाल नितेश राणे यांनी केला. मुख्यमंत्री जनतेला कोरोनाचे नियम पाळायला सांगतात. पण नाकाखाली काय सुरू हे पाहात नाहीत, अशी टीकासुद्धा त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER