रालोआतून बाहेर पडल्याबद्दल शिवसेनेने केले अकाली दलाचे स्वागत

Sanjay Raut - Akali Dal

मुंबई : शेतकरी बिलांच्या विरोधात अकाली दलाने रालोआच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शिवसेनेने (Shiv Sena) अकाली दलाचे स्वागत केले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत ट्विट केले आहे – शेतकऱ्यांच्या हितासाठी रालोआशी संबंध तोडण्याच्या निर्णयाचे स्वागत.

अकाली दल आणि शिवसेना हे दोघेही रालोआत भाजपाचे सर्वात जुने सहकारी होते. आता दोधेही रालोआतून बाहेर पडले आहेत. गेल्या काही वर्षात रालोआतून बाहेर पडणारा अकाली दल हा हा तिसरा मोठा पक्ष आहे. पक्षाच्या केंद्रातील मंत्री हरसिमरत कौर (Harsimrat Kaur Badal) – बादल यांनी काही दिवसांपूर्वीच शेतकरी बिलांच्या विरोधात मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER